
कणकवली : कणकवली शहरात टेबवाडी येथे सुवर बाजार च्या मागील शेतात 5 जनावरांचा अचानक मृत्यू झाला आहे. नेमका मृत्यू कसा झाला हे माहित नसलं तरी वैद्यकीय अधिकारी यांनी विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
चार म्हशी आणि एक गाय त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर प्रसरला आहे. घटनेची माहिती समजतात स्थानिक नागरिक व यावेळी तलाठी पशुवैद्यकीय अधिकारी हे देखील उपस्थित आहे नेमका यांचा मृत्यू कसा झाला याची माहिती हे सर्वजण घेत आहेत.
आणखीही काही जनावरांना विषबाधा झाल्याचा अंदाज काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे नेमकं हे कशामुळे झालं याचं कारण स्पष्ट होणं गरजेचे आहे, अशी मागणी उपस्थित नगरसेवक व नागरिक करत आहेत.










