
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील राजकीय वातावरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांमुळे चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज खरेदीच्या आजच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. आज दिवसभरात जिल्हा परिषदेसाठी २३, तर पंचायत समितीसाठी २८ अर्जांची खरेदी करण्यात आली. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांचा मोठा भरणा दिसून येत आहे.
जिल्हा परिषद: दिग्गजांकडून अर्जांची खरेदी
जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे मात्र अपक्ष देखील जोडीला आहेत.
पावशी मतदारसंघ: येथून भाजपचे जयेश चिंचळकर, शिवसेना (शिंदे गट) कडून अरविंद करलकर आणि सिद्धेश परब यांनी अर्ज खरेदी केले आहेत. तसेच भानुदास रावराणे, मंदार कोठावळे, प्राजक्त चव्हाण, शंकर परब आणि तानाजी पालव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज खरेदी केला आहे.
घावनळे मतदारसंघ: येथे शिवसेना (उबाठा) कडून सखाराम खोचरे, तर शिंदे गटाकडून केशव नार्वेकर व अपक्ष उमेदवार म्हणून आनंद मेस्त्री यांनी अर्ज घेतले आहेत.
आम्ब्रड मतदारसंघ: येथून सिया तेली आणि दीपलक्ष्मी पडते (दोन्ही शिंदे गट) यांनी अर्ज खरेदी केले.
पिंगुळी मतदारसंघ: तन्मय वालावलकर (भाजप), विनायक राणे (शिवसेना शिंदे गट),
नेरूर देऊळवाडा मतदार संघ: संजय पडते (शिंदे गट), बाळकृष्ण पावसकर (अपक्ष)
वेताळबांबर्डे मतदार संघ: नागेश अईर (शिंदे गट)२ अर्ज, प्राजक्त पंढरी चव्हाण (अपक्ष)
आणि माणगाव मतदारसंघातून दीपक काणेकर (भाजप) २ अर्ज, सदाशिव आळवे (अपक्ष), निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत.
पंचायत समिती: चुरस वाढली
पंचायत समितीच्या जागांसाठीही मोठ्या प्रमाणात अर्ज खरेदी झाले आहेत. विशेषतः डीगस, साळगाव आणि झाराप या गणांमध्ये अधिक चुरस दिसत आहे.
डीगस गण : बुद्धानाथ गोसावी २अर्ज, निखील कांदळगावकर, सदानंद अनावकर (शिंदे गट) विरुद्ध नारायण मांजरेकर २ अर्ज, अनंत टंगसाळी (उबाठा), लीलाधर आणावकर (उबाठा) असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
साळगाव : मिलिंद नाईक, दिनेश साळगावकर (शिंदे गट) आणि रोहित सावंत (उबाठा), वीरेंद्र चव्हाण (अपक्ष) यांनी अर्ज नेले आहेत.
आंब्रड मधून योगेश घाडी, प्रितेश गुरव (शिंदे गट),
जांभवडे मधून बाळकृष्ण मडव (शिंदे गट),
झाराप: अश्पाक कुडाळकर २ अर्ज (उबाठा) आणि अच्युत तेंडोलकर २ अर्ज, हेमंत भगत (शिंदे गट), अच्युत तेंडुलकर (अपक्ष) यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.
कसाल मतदारसंघातून संजय अहिरे यांनी अर्ज खरेदी केला आहे.
महिला उमेदवारांचा सहभाग : घावनळे मतदार संघ: सोनिया मुंज (उबाठा), संजना माडगूत (शिंदे गट),
रश्मी नाईक (शिंदे गट - नेरूर दक्षिण), अश्विनी सावंत (शिंदे गट - वेताळबाम्बार्डे) आणि निता नाईक (शिंदे गट - नेरूर उत्तर), यांनी आपले उमेदवारी अर्ज निश्चित केले आहेत.
राजकीय समीकरणे
आजच्या अर्ज खरेदीच्या आकडेवारीवरून कुडाळ तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अत्यंत आग्रही असल्याचे दिसत आहे. त्यापाठोपाठ शिवसेना (उबाठा) आणि भाजपनेही आपली इच्छुकता दाखवण्यास सुरुवात केली आहे. अनेक जागांवर अपक्ष उमेदवारांनीही अर्ज घेतल्यामुळे मुख्य पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या प्रक्रियेनंतरच खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होईल.










