
मंडणगड : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून वैज्ञानीक दृष्टीकोन विकसीत व्हावा या उद्देशाने मंडणगड पंचायत समितीचे शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा पाच दिवसांचा इस्त्रो या संस्थेस भेट व तेथे अभ्यास करण्याचे अनोख्या उपक्रमास 17 फेब्रुवारी 2025 रोजी सुरुवात झाली गटशिक्षण अधिकारी नंदालाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात वीस शिक्षक या दौऱ्यात सहभागी झाले आहे. या दौऱ्यात ते विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देऊन आंतार संशोधनाची माहीती आत्मसात करणार आहेत. या दौऱ्याचे समारोपानंतर सर्व शिक्षकांनी दौऱ्यात केलेला अभ्यास व तेथील अनुभव यांचे लिखाण करुन त्यांची एक स्मरणीका मंडणगड पंचायत समितीचे माध्यमातून प्रकाशीत करण्यात येणार आहे ज्यांचा उपयोग भविष्यात विद्यार्थी व शिक्षकांना होणार आहे.
शिक्षकांचे माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठीचे विविध प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतलेला असल्याचे गटशिक्षण अधिकारी नंदलाल शिंदे यांनी माध्यमांना सांगीतले आहे. देशात वैज्ञानिक व शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठी तसेच विविध विषयात जागतीक दर्जाचे संसोधन व्हावे याकरिता शासन प्रयत्नशील असून त्यासाठी विद्यार्थी दशेतच हे संस्कार देण्यासाठी विद्यार्थीचे दौरे आयोजीत केले जातात शिक्षक सुस्कांरीत नागरीक निर्माण करीत असल्याने त्यांचे माध्यमातून विज्ञानीक दृष्टीकोन विकसीत व्हावा या उद्देशाने मंडणगड तालुक्याने पुढकार घेत जिल्ह्यात पहीले पाऊल पुढे टाकलेल असल्याचे श्री. शिंदे यांनी या निमीत्ताने सांगीतले आहे.