शिक्षकांचं रजा आंदोलन !

Edited by: संदीप देसाई
Published on: September 05, 2023 18:16 PM
views 88  views

दोडामार्ग : शिक्षक भरती करण्यास शासनाची उदासिनता याचा गुणवत्तेवर होणारा परिणाम,अभ्यासक्रमाव्यतिरिक्त राबविण्यात येणारे उपक्रम, सातत्याने अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांना गुंतवून ठेवणे आणि शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांचे विविध प्रश्न प्रलंबित राहिल्याने ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यानी सामूहिक रजा आंदोलन  छेडले.  येथील तहसिल कार्यालयासमोर हे आंदोलन छेडण्यात आले. 

   सिंधुदुर्ग जिल्हयात ११३७ पदे रिक्त असून १३० प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी आहेत त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत असल्याचं संघटनेच म्हणणं आहे. याबाबत  दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, म्हटले की १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी राज्य सरकारी- निमसरकारी मध्यवर्ती समन्वय समितीच्या बेमुदत संपावेळी राज्यसरकारने जुन्या पेन्शनबाबत आश्वस्त केलं होतं. परंतु त्यानंतर शासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने प्राथमिक शिक्षक समितीने सामूहिक रजा घेत आंदोलनं केलं आहे. शासन एकीकडे शिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामात गुंतवत आहे. दुसरीकडे राज्यातील शिक्षकाची रिक्त पदे भरणे, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे, सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी जमा करणे, पगार दरमहा एक तारिखलाच करणे अशा अनेक मागण्या शिक्षकांच्या आहेत. या अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक समिती दोडामार्ग च्या पदाधिकाऱ्यानी हे आंदोलन छेडलं होते.

यावेळी शिक्षक नेते जयसिंग खानोलकर, सरचिटणीस प्रशांत झालबा, कार्याध्यक्ष अशोक भोसले, तालुकाध्यक्ष दीपक दळवी, उपाध्यक्ष गितांजली सातार्डेकर, अमित पाटील  यांसह तेजा ताटे , सुनिल गवस , दत्ताराम दळवी, रामचंद्र तोरस्कर, रुपा पाटील, विठ्ठल गवस, महेश काळे, जयसिंग गावित, दीपा दळवी , सगुण कवठणकर, कुमुदिनी दळवी, संजीवनी नाईक, उत्तम कुडव, अरविंद गवस आदी अनेक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.