वेंगुर्ल्यात भाजपच्यावतीने शिक्षकदिनी 'गुरुवंदना' !

सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार
Edited by: दिपेश परब
Published on: September 05, 2023 17:12 PM
views 98  views

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून "गुरुवंदना" कार्यक्रमा अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील दहा सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा शाल, भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन साहित्यिक, शिक्षक अजित राऊळ व भाजप प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

      ५ सप्टेंबर हा शैक्षणिक विश्वातील एक महत्त्वाचा दिवस. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कारण डॉक्टर राधाकृष्णन हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक व तत्वज्ञ होते. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून या कार्यक्रमाचा सुरुवात करण्यात आली.

    यावेळी रमण किनळेकर (आसोली हायस्कूल), शामराव काळे (वेंगुर्ले हायस्कूल), जागृती वायंगणकर (चमणकर हायस्कूल आडेली), एम. जी.मातोंडकर (अणसुर पाल हायस्कूल), श्री.शिरोडकर (अ.वि.बावडेकर - शिरोडा), श्रीम. वेंगुर्लेकर (आसोली हायस्कूल), श्रीम. वालावलकर (सातेरी हायस्कूल वेतोरे), श्री. कांबळी (न्यु.इंग्लिश स्कुल उभादांडा), आनंद सावंत (अ.वि.बावडेकर - शिरोडा), अवधूत ऐनजी (अ.वि.बावडेकर - शिरोडा)  इत्यादी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला हायस्कूलचे १९६७ चे माजी विद्यार्थी व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त शाखा व्यवस्थापक प्रकाश नांदोस्कर हे माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सामंत सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक पी.डी. कांबळे यांनी मांनले.

  हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना.उर्फ बाळू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाअध्यक्ष सुहास गवंडळकर, सरपंच संघटना अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, दिलीप परब, वसंत तांडेल , दादा केळुसकर, भुषण सारंग इत्यादी कार्यकर्त्यांची मेहनत घेतली.