'शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजेत' | कणकवलीत ठाकरे शिवसेनेचे पं. स.समोर ठिय्या आंदोलन...!

Edited by:
Published on: June 15, 2023 19:24 PM
views 181  views

कणकवली : कणकवली तालुक्यात तोंडवली, वायंगणी, खारेपाटण, साळिस्ते, शिरवल या ठिकाणाच्या शाळा शून्य शिक्षक आहेत. या शाळांवर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून शिक्षकसेवक पदे भरण्यात यावीत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे या मागणीसाठी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कणकवली पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. 


'शिक्षणमंत्री हाय हाय', 'शिक्षणमंत्र्यांचे करायचे काय खाली डोकेवर पाय', '५० खोके एकदम ओके’, ‘शिवसेनेचा विजय असो', 'उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ' शिक्षण आमच्या मुलांच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'शिक्षक नसलेल्या शाळांना शिक्षक मिळालेच पाहिजेत' अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर

दणाणून सोडला. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके,

तालुकासमन्वयक तेजस राणे, माजी जि. प. सदस्य स्वरुपा विखाळे, वैदेही गुडेकर,दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री,शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, सचिन आचरेकर, सचिन सावंत,

रुपेश आमडोसकर, विलास गुडेकर, कलमठ ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, धीरज मेस्त्री, सचिन खोचरे, कलमठचे माजी सरपंच निसार शेख, सिंदकर मेस्त्री, जयेश धुमाळे, नितेश भोगले, प्रसाद चव्हाण, ललित घाडीगावकर यांच्यासह

शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात तोंडवलीतील पालक व आपल्या पाल्यांना घेऊन सहभागी झाल्या होत्या. त्यांनी शाळेला कायमस्वरुपी शिक्षक देण्याची मागणी केली.

यावेळी सुशांत नाईक व शैलेश भोगले यांनी निवेदन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांना सादर केले. त्यांनी दिलेल्या

निवेदन म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन व शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि. प. प्राथमिक शाळांची वाताहात झाली आहे. त्यातच जिल्ह्यातील शिक्षकांच्या परजिल्ह्यात बदल्या झाल्याने १,१४० शिक्षकांची पदे रिक्त

आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिक्षक भरत करण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. तालुक्यातील ५ शाळा शून्य शिक्षकी आहेत. या शाळांवर तात्पुरत्या स्वरुपात जि. प. च्या स्वनिधीतून शिक्षक सेवकांची पदे

भरण्यात यावी आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी पाचही शाळांवर तात्पुरती पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.