
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टीत करण्यात आलेल्या वाढीविरोधात एल्गार परिषदेच आयोजन केशवसुत कट्टा येथे करण्यात आल. यावेळी सर्वपक्षीयांनी उपस्थित राहत करवाढ रद्द करण्यासाठी एकमुखी ठराव मांडला. तर दरवाढीला स्थगिती देण्यासाठी भाषा मंत्र्यांना आज मुख्यमंत्र्यांना पत्र द्याव लागलं हि आपल्या एकीची ताकद आहे. या पत्रामुळे करवाढीमागची अदृश्य शक्ती जनतेसमोर आली असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांच नाव न घेता बबन साळगावकर यांनी केला.
दरम्यान, याप्रसंगी उपस्थित ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, बाळा गावडे, प्रा. केदार म्हसकर, अँड. राजू कासकर, जास्मिन लक्ष्मेश्वर, संजय पेडणेकर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केल. ज्येष्ठ नेते अण्णा केसरकर, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी ही दरवाढ रद्द झाली पाहिजे, त्यासाठी सर्व नागरिक एकत्र येऊन लढा उभारूया, संविधानीक मार्गानं आंदोलन करत वेळप्रसंगी विचारांचा दगड भिरकवूया असं मत अण्णा केसरकर यांनी व्यक्त केल.
याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, ८ वर्षांत नगराध्यक्ष असताना ८ बजेट सादर केली. परंतु, नागरीकांना आर्थिक बोजा पडणार नाही याची काळजी घेत बजेट सादर केल. त्यामुळे नगरपरिषदेचा पैसा मुरतो कुठे ? याचा विचार करावा लागेल. मधल्या काळात झालेल्या सत्तांतरात प्रचंड प्रमाणात जी भरती केली गेली त्यांच्या पगारासाठी असंख्य पैसे खर्च होत आहेत. ते पैसे वसूल करण्यासाठी पाणीपट्टीत प्रचंड प्रमाणात वाढ केली गेली. ही बाब निषेधार्ह आहे. आज महागाई वाढली असताना करवाढ नागरिकांवर अन्याय करणारी आहे. या विरोधात घराघरातून आवाज उठवला गेला पाहिजे. बबन साळगावकर जेव्हा एखादी गोष्ट हाती घेतो त्यावेळी 'भाषा मंत्र्यांना' जाग येते, दरवाढीला स्थगिती देण्यासाठी त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र दिल. गेले १५ दिवस वेगवेगळ आंदोलन केलं. पण, आज आपण एकत्र आलोत. एकत्र आंदोलनाची ताकद काय असते हे आज दिसून आल. भाषा मंत्र्यांना स्थगितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवाव लागल हे आपलं यश आहे. आपल्या एकीचा धसका मंत्र्यांनी घेतला आहे. नागरिकांच्या बाजूनं निर्णय लागेपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी गर्जना बबन साळगावकर यांनी केली. तर शिमगोत्सवानंतर याबाबतच आंदोलन सुरू करण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी केलेल्या करवाढीवर मुख्याधिकारी यांनी मनात आणलं तर यावर तोडगा निघू शकतो. त्यामुळे हे कर कमी करावेच लागतील. आज दिलेलं पत्रामुळे करवाढी मागची अदृश्य शक्ती समोर आली आहे. जखमा आपणच करायचा अन् औषधही आपणच द्यायचं यातला हा प्रकार आहे. घरपट्टी व पाणीपट्टी रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अस मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, ज्येष्ठ नेते अण्णा केसरकर, रुपेश राऊळ, महेश परूळेकर, बाळा गावडे, सुरेश भोगटे, उमाकांत वारंग, डॉ. जयेंद्र परुळेकर, जगदीश मांजरेकर, समीर वंजारी, देवेंद्र टेमकर, शैलेश गवंडळकर, इफ्तेकार राजगुरू, आशिष सुभेदार, बाळासाहेब बोर्डेकर, समीरा खलील, माया चिटणीस, अँड. राघवेंद्र नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, अँड. राजू कासकर, अफरोज राजगुरू, सावली पाटकर, जास्मिन लक्ष्मेश्वर, दर्शना बाबर-देसाई,रवी जाधव, विलास जाधव, प्रा. केदार म्हसकर, अँड. सायली दुभाषी,संजय पेडणेकर, संतोष तळवणेकर, बाबल्या दुभाषी, मोहिनी मडगावकर आदींसह सर्वसामान्य नागरिक, व्यापारी उपस्थित होते.