१९७१ च्या भारत- पाक युद्धातील रणगाडा कुडाळात !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 20, 2024 13:53 PM
views 175  views

कुडाळ : १९७१ च्या भारत- पाक युद्धामध्ये महापराक्रम गाजवलेल्या T- 55 या रणगाड्याचे कुडाळ येथे  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका नजीक भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून सोडत एनसीसी कॅडेटच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

             

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना भारतीय सेनेने गाजवलेल्या महापराक्रमाची माहिती व्हावी, त्यांना भारतीय सैन्याच्या शस्त्र सामुग्रीचे ज्ञान मिळावे म्हणून भारतीय थल सेनेकडे रणगाडयाची ( Tank T-55  ) मागणी केली होती. ही मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, खासदार विनायक राऊत व तत्कालीन जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. याचे सर्व कागद पूर्तता पूर्ण झाल्यानंतर हा रणगाडा शुक्रवारी पुण्यातून निघाला होता. या रणगाड्याचे शनिवारी सायंकाळी उशिरा कुडाळ येथे आगमन झाले यावेळी जल्लोषात या रणगडाचे स्वागत करण्यात आले.


 हा रणगाडा १९७१ च्या भारत-पाक युध्दात महापराक्रम गाजवलेल्या रणगाडयापैकी एक रणगाडा आहे. या रणगाड्याचे कुडाळ येथे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी बोलताना सांगितले की हा रणगाडा १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धामध्ये सहभागी झाला होता. या रणगाड्याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी. तसेच विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत व्हावी. या रणगडाची माहिती सर्वांना ज्ञात ओवी या हेतूने हा रणगाडा बॅरिस्टर नातपय प्रणांगणात ठेवला जाणार आहे. येत्या काही दिवसात हा रणगाडा सर्वसामान्य नागरिकांना विनाशुल्क पाहता येणार आहे. 


तर याबाबत शासनाकडून कटोर नियम घालून देण्यात आले असून याच पावित्र्य राखण्याची ही जबाबदारी संस्थेची असणार असल्याचे यावेळी बॅरिस्टर नातपय संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी सांगितले.