तांबळडेग किनारपट्टीची धूप ; ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 05, 2023 16:18 PM
views 221  views

देवगड : तांबळडेग इथं किनारपट्टीची धूप होतेय. समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने तांबळडेग किनारपट्टीची हाेत असलेली धुप व वस्तीच्या दिशेने  पुढे सरसावत असलेला समुद्र यामुळे तांबळडेग गाव भीतीच्या छायेखाली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पक्का दगडी धुपप्रतिबंधात्मक बंधारा बांधून मिळावा अशी मागणी ग्रामस्थांचीआहे.