
देवगड : देवगड तांबळडेग किनाऱ्याची वन्यजीव सप्ताहाच्यापार्श्वभूमीवर स्वच्छता करण्यातआली असून वन्यजीव सप्ताहा निमित्त देवगड कॉलेज NCC unit, उन्नत भारत अभियान कक्ष आणि वनविभाग, महाराष्ट्र शासन यांनी पुनीत सागर अभियानातंर्गत तांबळडेग किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली आहे. या स्वच्छता मोहिमेमध्ये वनविभाग अधिकारी श्रीकृष्ण परीट, धुळू कोळेकर, प्रतीक चौगुले, स्थानिक कासव संवर्धक सागर मालंडकर, वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार, NCC officer लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे, उन्नत भारत अभियान कक्षाचे डॉ. नितीन वळंजू, गुरुप्रसाद घाडी, B.Voc. अभ्यासक्रमाचे MoU समन्वयक अमोल तेली आणि ४० NCC cadets नी सहभाग घेतला.
वन विभाग अधिकारी आणि वन्य जीवरक्षक यांनी सांगितले की तांबळडेग किनाऱ्यावर समुद्री कासव मोठयाप्रमाणात अंडी घालतात आणि दरवर्षी हजारो पिल्ले येथून समुद्रात जातात. सागरी परिसंस्थेमध्ये कासवांचे कार्य महत्वाचे असल्याने तांबळडेग सारखे किनारे कासवांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ असणे गरजेचे असल्याने या किनाऱ्याची निवड करण्यात आली आहे. सुमारे ५० – ६० किलो अविघटनशील कचरा गोळा करण्यात आला आणि पुढील प्रक्रीयेसाठी स्थानिक कचरा व्यवस्थापन विभागाकडे देण्यात आला.