तळवडे अर्बन को - ऑपरेटिव्ह सोसायटीच्या ठेवी १३ कोटींच्या दरम्यान..!

Edited by: विनायक गावस
Published on: July 31, 2023 14:03 PM
views 128  views

सावंतवाडी : तळवडे गावात 23 वर्षांपूर्वी तळवडे अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ची स्थापना करण्यात आली .या संस्थेची स्थापना सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय प्रकाश परब यांच्या संकल्पनेतून करण्यात आली .यावेळी या लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या तळवडे अर्बन को ऑप सोसा. आता 13 कोटीच्या आसपास उलाढाल करत आहे. याचे सर्व श्रेय येतील सभासद ग्राहकांना जात आहे असे मत स्वर्गीय प्रकाश परब मित्र मंडळाचे पदाधिकारी व माजी शिक्षक लिलाधर घाडी यांनी तळवडे अर्बन अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 23 वर्धापन दिन सोहळ्या वेळी व्यक्त केले. 

या कार्यक्रमवेळी तळवडे अर्बन को ऑपा सोसायटीचे उपाध्यक्ष विलास परब माजी मुख्याध्यापक श्यामसुंदर मालवणकर , तळवडे अर्बन सोसायटीचे माजी अध्यक्ष दिलीप मालवणकर. माजी उपाध्यक्ष नारायण परब,  संचालक सुभाष रेडकर ,सगुण जाधव तसेच  अर्बन को ऑप सोसा व्यवस्थापक विनोद वराडकर ,योगेश सावंत ,दिनेश परब रघुनाथ रेडकर, सुरज परब, सगुण जाधव तसेच सोसायटीचे सभासद वर्ग खातेदार व अन्य मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . तळवडे अर्बन को ऑपे सोसायटीचा 23 वा वर्धापन दिन तळवडे अर्बन  को ऑप सोसा कार्यालयात संपन्न झाला .

यावेळी विविध मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शवली तळवडे अर्बन  को ऑप सोसां. मार्फत विविध उपक्रम राबवले जातात. तळवडे  अर्बन को-ऑपरेतीव्ह सोसायटी गेली 23 वर्ष लोकांना चांगली सेवा देत आहे. तळवडे अर्बन को-ऑप सोसायटीचे संचालक मंडळ संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असते .यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक नारायण परब यांनी केले.