तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरण

तिसरा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात | १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
Edited by:
Published on: January 13, 2025 20:09 PM
views 229  views

सावंतवाडी : तळवडे ग्रामपंचायत शासन निधीत सुमारे ७२ लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी संशयित तिसरा आरोपी धोंडी गजानन बांदिवडेकर याला पोलिसांनी रविवारी रात्री साडेदहा वाजता ताब्यात घेतले. त्याला अटक करत आज येथील न्यायालयात हजर केले असता 15 जानेवारी पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरणी याआधी मुख्य मुख्य संशयित आरोपी तथा तळवडे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नामदेव रामचंद्र तांबे व बांद्यातील अन्य एका संशयित ठेकेदाराला  सावंतवाडी पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामीनावर मुक्तता झाली आहे. दरम्यान अजून तीन संशयित आरोपींच्या मागावर सावंतवाडी पोलीस होते रविवारी रात्री यातील तिसरा संस्थेत आरोपी धोंडी बांधवडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. अपहर प्रकरणात बांधवेकर यांच्या खात्यावर सुमारे 26 लाख इतका निधी जमा झाला होता. प्रत्यक्षात कामे केली नसताना बिलापोटी ही रक्कम जमा करण्यात आली होती. दरम्यान त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाचे पोलीस कोरडे सुनावण्यात आली अत्यापही यातील दोन आरोपी अद्यापही मोकाट आहेत.