तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरण

ग्रामसेवक तांबे यास ३ दिवसांची पोलीस कोठडी
Edited by:
Published on: January 03, 2025 15:34 PM
views 1196  views

सावंतवाडी : तळवडे ग्रामपंचायत अपहार प्रकरणामध्ये प्रमुख संशयित तत्कालीन ग्रामसेवक नामदेव रामचंद्र तांबे यांचा जामीन अर्ज हायकोर्टाकडून फेटाळण्याबाबत पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून व सादर केलेल्या पुराव्यावरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यावर व योग्य पुरावा प्राप्त झाल्यावर ग्रामसेवक तांबे यास २ जानेवारी रोजी अटक करण्यात आली.

येथील सावंतवाडी न्यायालयात त्यांना हजर केले असता ३ दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे‌. तसेच दुसरा संशयित, ठेकेदार प्रथमेश कमलाकर धुरी याला आज अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली आहे.