देवगडात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 06, 2023 18:48 PM
views 172  views

देवगड : शिक्षण विभाग पंचायत समिती देवगड व श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलयांच्या संयुक्त विद्यमाने 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.  कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले,  प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात ,अधिव्याख्याता डॉक्टर लहू आचरेकर उपस्थित होते.तसेच या प्रदर्शनाला गटविकास अधिकारी  पं.स.देवगड आप्पासाहेब गुजर व सहाय्यक गटविकास अधि. निलेश जगताप यांनी भेट देऊन प्रतिकृतीची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक ,माध्यमिक शाळांनी सहभाग घेऊन विज्ञान प्रदर्शन यशस्वी केले. यामध्ये वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा स्पर्धा, शिक्षक साहित्य, विद्यार्थी प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली होती. सर्व अधिकाऱ्यांनी एकूण नियोजनाबद्दल व कार्यक्रमाच्या सादरीकरण बद्दल समाधान व्यक्त केले.

 विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी देवगड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे, पडेल ग्राम सुधारणा मंडळ मुंबई या संस्थेचे  अध्यक्ष अशोक पाटणकर सचिव जितेंद्र मांजरेकर, कार्याध्यक्ष संदीप तानवडे,प्रकाश तानवडे, गणेश हर्यान,संस्थेचे चेअरमन दीपक पडेलकर,सदस्य संजय घाडी ,केंद्रप्रमुख अशोक जाधव,  पडेल हायस्कूलचे मुख्याध्यापक  हिराचंद तानवडे  सर्व शिक्षक शिक्षकेतर .माजी सरपंच व सोसायटी चेअरमन संजय मुळम, माजी सरपंच विकास दीक्षित, केवल ठाकूर देसाई,तंटामुक्ती अध्यक्ष वैभव वारीक, माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत तानवडे, गणपत वारीक, सोसायटी संचालक यदुनाथ ठाकूर देसाई सर्व प्राथमिक व माध्यमिक संघटना प्रतिनिधी,तसेच सर्व माजी मुख्याध्यापक विलास करंजेकर, बी एन पाटणकर, माजी शिक्षक गजानन निबंधे विद्या कदम, सुरेश जाधव इंदिराकांत महांबरे,शुभांगी बोडस, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष सत्यपाल लाडगवकर,वाडा हायस्कूल मुख्याध्यापक नारायण माने, पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.

 या प्रदर्शनाला विजयदुर्ग, गिर्ये , वाडा, सौंदाळे हायस्कूल तसेच पंचक्रोशीत प्राथमिक शाळांचे  विद्यार्थी  व शिक्षक यांनी भेट दिली.. . उद्घाटनच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा कोकरे व रविराम माळेगाव यांनी केले तर बक्षीस वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रज्ञा जोशी व शैलेश काळसेकर यांनी केले.