
सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि तालुका समन्वय समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा श्री जनता विद्यालयाच्या मैदानात नुकत्याच संपन्न झाल्या.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा चे मुख्याध्यापक तथा सावंतवाडी तालुक्याचे समन्वयक नंदकिशोर नाईक यांनी विद्यार्थी खेळाडूंना स्पर्धेच्या सूचना व शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व सहभागी संघ सर्व क्रीडा शिक्षक व पंच आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थांचे स्वागत करण्यात आले.
या दोन दिवशी क्रीडा स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे असून 14 वर्षा खालील मुलगे विजेता संघ-मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी, उपविजेता संघ- माध्यमिक विद्यालय सांगेली - आणि तृतीय क्रमांक-मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव, 14 वर्षाखालील मुली विजेता संघ--मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी. उपविजेता संघ -विलवडे हायस्कूल आणि तृतीय क्रमांक -दानोली हायस्कूल. 17 वर्षाखालील मुलगे विजेता संघ-मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी,उपविजेता संघ- श्री जनता विद्यालय तळवडे, तृतीय क्रमांक- दानोली हायस्कूल,17 वर्षाखालील मुली विजेता संघ - राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी, उपविजेता संघ- माध्यमिक विद्यालय सांगेली आणि तृतीय क्रमांक - मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल. 19 वर्षाखालील मुलगे विजेता संघ- राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी व उपविजेता संघ- माध्यमिक विद्यालयव जूनियर कॉलेज सांगेली. सर्व विजेत्या संघाची निवड सिंधुदुर्ग नगरी क्रीडा संकुल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जनता विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दयानंद बांगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय सोनवणे यांनी केले.