
दोडामार्ग : तळकट येथे नळ योजना दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी सरपंच एम. डी. धुरी यांच्या हस्ते व विद्यमान सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीतमाजी सरपंच एम. डी. धुरी यांच्या हस्ते व विद्यमान सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
तळकट कट्टा येथील नळ योजना सुस्थितीत चालू आहे, मात्र या नळ योजनेला ३० वर्षे झाली. त्यामुळे या नळ योजनेच्या विहिरीची व नवीन पाईपलाईन दुरुस्ती काम जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी माजी सरपंच महादेव धुरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, उपसरपंच रमाकांत गवस, अंकुश वेटे, प्रज्योत देसाई, चंद्रास राऊळ, आनंद राऊळ, दाजी नांगरे, ग्रामपंचायत कर्मचारी राघोबा देसाई, नळ कामगार राजेश लांबर, दिलीप राऊळ, बाळा देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या नळ योजनेच्या बळकटीकरण मुळे ग्रामवासियाना अधिक नियोजनबध्द व नियमित पाणी देता येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीतर्फे विशेष मेहनत घेतली जात आहे.