तळेखोल पंचक्रोशी ही 'संगीत आराधना' : राजेंद्र म्हापसेकर

Edited by: संदीप देसाई
Published on: January 14, 2024 09:11 AM
views 182  views

दोडामार्ग : तळेखोल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रातील कलेची जोपासना केली आहे. शिवाय गावातील अनेकांनी दशावतारी कला, भजन कला, गायन कला अशा विविध कलांमध्ये आपले नावलौकीक केले अशा कलाकारांचा आपल्या हस्ते सत्कार होणे हे मी माझा भाग्याचे समजतो. तळेखोल पंचक्रोशीची, संगीताची आराधना करणारे गाव अशीच ओळख आहे असे प्रतिपादन जि. प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केले. 

ते तळेखोल येथील ' नाद गोविंदम ' या कार्यक्रमात बोलत. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भाजपचे जिल्हा पदाधिकारी माजी जि. प. सदस्य चंद्रकांत मळीक, सामाजिक कार्यकर्ते बापू सावंत, तळेखोल सरपंच वंदना सावंत, उपसरपंच महादेव नाईक, वझरे सरपंच सुरेश गवस, ग्रा. पं. सदस्य श्याम गवस, उर्मिला गवस, संदीप दळवी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

यावेळी अशोक गंगाराम शिरसाट, मुकुंद अर्जुन गवस, बाळू वासुदेव गवस, दशरथ यकलो गवस, उदय शंकर वझे, रामचंद्र नारायण वझे, विश्वास लक्ष्मण वझे, गुणाजी रावजी खोत, बाबली महादेव गवस या ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पंचक्रोशीतील कला, संगीत क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तीं यांसह पोलीस पाटील पांडुरंग सावंत, भजनी कलाकार गुरूदास गुरव यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमनाथ गवस यांनी केले.

यावेळी भावना व्यक्त करताना जेष्ठ दशावतारी कलाकार मुकुंद गवस यांनी दशातार कलेची जोपासना कशी केली हे सांगताना रॉकेलच्या दिव्याची आठवण केली ते म्हणाले आम्ही काळोखात रियलसल करायचो ही मुले काहीतरी चांगल करतात म्हणून एका सदगृहस्थाने आम्हांला रॉकेलचा दिवा दिला त्यामुळे आम्हांला रियलसल करताना सोपे झाले आणि ती प्रेरणा देणारी गोष्ट ठरली. त्यामुळे इथल्या कलाकारांनी अनेक गावांत दशावतार नाटयप्रयोग सादर केले  असेही गवस म्हणाले.