तळेबाजार महालक्ष्मी मंदीराचा ३४ वा वर्धापदिन सोहळा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 16, 2024 12:53 PM
views 90  views

देवगड : तळवडे - तळेबाजार येथील श्री . देवी महालक्ष्मी मंदीराचा  ३४ वा वर्धापदिन सोहळा दिनांक १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त  शनिवार दि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ०८ श्रीदेवी चरणी एकादशमी ( अभिषेक ) ,सकाळी १० वा आकारी ब्राम्हणदेव प्रासा . भजन मंडळ ,तळवडे खालची धुरीवाडी बुवा श्री . दिलीप लवू धुरी  सकाळी १० ते११ .३० श्री . सत्यनारायण महापूजा , सकाळी ११ .३o ते १२  आरती व तिर्थप्रसाद ( समस्त धुरीमंडळी ) , सकाळी ११ .३० समई नृत्य ( श्री .ब्राम्हणदेव महिला मंडळ , नाद - भोळेवाडी ) प्रायोजक श्री . सुभाष शांताराम धुरी , दुपारी १२ ते ३ महाप्रसाद (सौजन्य श्रीम रूपाली धुरी , श्री . संदीप धुरी , श्री . संजय धुरी , श्री .बाबुराव बोडेकर ,दुपारी १ वाजता आमने सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना बुवा श्री अभिषेक शिरसाट  कोटेश्वर नवतरुण प्रा . भजन मंडळ हरकुळ बुद्रुक ता .कणकवली विरूद्ध बुवा श्री सचिन रामचंद्र कोयंडे, कोयंडे बंधु प्रा . भजन मंडळ , मुंबई सायन / कालवी देवगड  यांच्यात रंगणार आहे . रात्री १०  वा ऑकेस्ट्रा सारेगमप कोल्हापुर , तसेच नाटक सर्व नाथी स्वार्थासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व कार्यक्रमांना सर्व भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त धुरी मंडळी, महालक्ष्मी सेवा मंडळी तळवडे, बागतळवडे,  तळेबाजार तसेच गणेश उत्साही मंडळ , गणेश नवतरूण उत्साही मंडळ आणि ग्रामस्थ , तळेबाजार यांनी केले आहे.