
दोडामार्ग : वायगंतड येथे झालेल्या भीषण अपघातात घोटगेवाडी व तिलारी येथील दोन व्यक्ती मयत झाले. त्यांच्या मृत्यूस कारणी भूत ठरलेल्या त्या मद्यधुंद वाहन चालकावर कठोरात कठोर कारवाई करा अन्यथा आम्ही सर्व घोटगेवाडी ग्रामस्थ रस्त्यावर उतर, असा इशारा सायंकाळी घोटगेवाडी ग्रामस्थांनी दोडामार्ग पोलिसांना दिला आहे. याबाबत रीतसर निवेदन दिलं आहे.
वायगंतड येथे दुचाकी व बोलेरो पीकप गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात घोटगेवाडी येथील संतोष शेटकर व त्यानंतर गंभीर जखमी अनामिका सोझ हिचा गोवा बांबोळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शेटकर यांच्या मृत्यूनंतर महिलेचे दुपारी निधन झालेचे समजताच त्यांचे नातेवाईक व अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे आक्रमक होत ग्रामस्थांनी सायंकाळी दोडामार्ग पोलीस स्टेशन गाठले व बेधुंद व मदयपान करून गाडी चालवणाऱ्या आदम हुसेन नाईकवाडी या गाडीचालकावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी केली. त्याच्यावर दारू पिऊन ड्रायव्हिंग केल्या प्रकरणी तसा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली. यावेळी मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.