संशयित हल्लेखोरांवर तात्काळ अटकेची कारवाई करा.!

कनेडी बाजारपेठ येथील राडा प्रकरण | सूर्यकांत विष्णू तावडे यांची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 04, 2023 09:23 AM
views 593  views

कणकवली  : कनेडी बाजारपेठ येथील शिवसेना कार्यालयात माझ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्लेखोरांच्या विरोधात आपण कणकवली पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्यापही त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी ही कारवाई न केल्यास माझ्या जीवितास हानी पोहोचण्याची शक्यता टाळता येत नाही, त्यामुळे माझ्यावर हल्ल्ला करणाऱ्यांवर तत्काळ अटकेची कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे सूर्यकांत विष्णू तावडे यांनी निवेदनाद्वार केली आहे. ही कारवाई दोन दिवसांत झाल्यास मी माझ्या सहकार्यांसमवेत कणकवली पोलीस स्टेशन समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


कनेडी बाजारपेठ येथील शिवसेना कार्यालयात २४ जानेवारीला माझ्यावर भाजपच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर मी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार सागर सावंत, संजना सावंत, सुनील सावंत, संजय सावंत, अशोक कांबळे, मिलिंद मेस्त्री, सर्वेश दळवी, स्वप्नील चिंदरकर, प्रफुल्ल काणेकर, किशोर परब, संजय उर्फ बाबू सावंत, धोंडी वाळके,शुभम सावंत, प्रदीप कांबळे, दत्ताराम गावकर यांच्यावर कलम ३०७, ३०४, ३०६,३२४, ३२३, १४३, १४८, १४९, १४७ अशी कलमे लावण्यात आली होती. मात्र, अद्यापही या १६ जणांवर अटकेची कारवाई कणकवली पोलिसांकडून करण्यात आलेली नाही. या १६ जणांपासून माझ्या जीविताला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसे न झाल्यास मी माझ्यासहकार्यांसमेवत कणकवली पोलीस ठाण्यासमोर उपोषणालाबसणार असून या घटनेबाबत आपण योग्य ती दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा, असे त्यांनी दिलेल्या निवेदतात म्हटले आहे.