
सावंतवाडी : पत्रकारांनी आपले काम केलेच पाहिजे. पण, आपले आयुष्य ही जपले पाहिजे. कामाला महत्त्व देता तेवढेच आरोग्याला महत्त्व द्या, शारीरीक व्यायाम करा आणि आरोग्य तंदुरूस्त ठेवा असे आवाहन भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे चेअरमन अॅड दिलीप नार्वेकर यांनी केले.
सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने गुरूवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यावेळी पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात नार्वेकर बोलत होते.
यावेळी विश्वस्त डाॅ.मिलिंद खानोलकर, संचालक उमाकांत वारंग, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, रमेश बोंद्रे, अमोल सावंत, शब्बीर मणियार, भरत गावडे, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, अवधूत पोईपकर, अर्जुन राणे, उत्तम वाडकर, प्राचार्य डाॅ. संजय दळवी, उपप्राचार्य डाॅ.ललित विठलानी, डाॅ.प्रविण देवरूषी डाॅ.नंदादिप चोडणकर, डाॅ.विशाल पाटील, करूणा गावडे, स्नेहलता मुननकर आदींसह पत्रकार विजय देसाई, संतोष सावंत, राजू तावडे, अनंत जाधव, रूपेश हिराप, संतोष परब, उमेश सावंत, अनिल भिसे आनंद धोंड, जतिन भिसे, कार्यालयीन कर्मचारी संदेश पाटील, पराग मडकईकर, नवनाथ परब, वामन राऊळ,अशोक बोलके आदि यावेळी उपस्थित होते.
अँड.नार्वेकर यांनी यावेळी पत्रकारांचे आरोग्य किती महत्वाचे आहे हे पटवून दिले तसेच आयुर्वेद महाविद्यालय आपल्यासाठी सदैव पाठीशी उभे आहे.एखाद्या आजारावर सतत गोळ्या घेणे योग्य नाही. तुम्ही डाॅक्टराचा सल्ला घ्या असे आवाहन ही नार्वेकर यांनी केले.
तर ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांनी आता प्रत्येकानेच स्वताःची काळजी घेतली पाहिजे. बदलत्या काळात आपणास हे गरजेचे आहे असे स्पष्ट केले तसेच प्रत्येकाने शारीरिक व्यायाम करावा असे आवाहन केले.तर संचालक वारंग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारांबाबत घडलेल्या एका घटनेमुळे आम्ही सर्वजण एकत्र येत ही आरोग्य तपासणी करण्याचे निश्चित केल्याचे यावेळी स्पष्ट केले.यावेळी प्राचार्य दळवी, राजू तावडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तर प्रास्ताविक संतोष सावंत यांनी केले. डाॅ.मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.