आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी कारवाई करा | शिवसेना अल्पसंख्यांक समाजाची मागणी

आ. वैभव नाईक, सतीश सावंत, सुशांत नाईक व अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जिद बटवाले यांनी घेतली कणकवली पोलिसांची भेट
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 01, 2023 15:39 PM
views 178  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अब्दुल मज्जिद अब्बास बटवाले यांनी आज आमदार वैभव नाईक,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासमवेत कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे, कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांची भेट घेऊन आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवतीची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवदेनाद्वारे  केली.हे कृत्य समाज विघातक कृत्य आहे.अशा प्रवृत्ती विरोधात कारवाई झालीच पाहिजे असे सांगितले.आ. वैभव नाईक यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा आढावा घेतला.

परगावातून आलेल्या एका युवतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पाकिस्तानचा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करणे व हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवला. त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर युवतीची योग्यती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हे कृत्य समाज विघातक कृत्य आहे.त्याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना अल्पसंख्यांक समाजाकडून जाहीर निषेध करीत आहोत असे दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी माजी नगरसेवक कन्हैया पारकर, अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस निसार शेख, राजू राठोड,अनुप वारंग, विलास गुडेकर,सचिन आचरेकर, नितेश भोगले, याकूब नावलेकर, अन्वर शेख, इमाम नावलेकर, मुजाहिद बोबडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.