अनधिकृत व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करा

मनसेची मागणी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: February 01, 2024 07:09 AM
views 327  views

कुडाळ : अनधिकृत व्हिडिओ गेम पार्लर वर कारवाई करा तसेच भविष्यात व्हिडिओ गेम पार्लरला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्ट मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देन्यात आले. यावेळी उप जिल्हाध्यक्ष कुणाला कीनळेकर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उप तालुकाध्यक्ष गजानन राऊळ सरंबळ शाखाध्यक्ष सिताराम कदम यावेळी उपस्थित होते. याबाबत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल केंद्रेकर यांनी कुडाळ येथे प्रसिद्धी पत्रकार द्वारे माहिती दिली.

मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कौशल्य (skill game) खेळाच्या नावाखाली अनधिकृत रित्या विनापरवाना व्हिडिओ गेम पार्लर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. व्हिडिओ गेम खेळताना मोठ्या प्रमाणात पैसे लावून झटपट मोठा आर्थिक फायदा होण्याच्या आशेने जिल्ह्यातील अनेक युवक आकर्षित होऊन त्यामध्ये पैसे लावून खेळत आहेत तसेच हा व्हिडिओ गेम प्रकार हा कौशल्य (skill game) खेळ नसल्यामुळे यामध्ये वापरण्यात येणारी मशीन ही कंम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रॅम असल्यामुळे सदर मशीन ऑपरेटर आपल्या मनाप्रमाणे मशीन ऑपरेटिंग सेट करत असतात आणि यामुळे हा गेम खेळणाऱ्या युवकांची फार मोठी आर्थिक लूट फसवणूक होऊन जिल्ह्यातील अनेक युवक व त्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

काही दिवसापूर्वी कणकवली येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत कारवाई करत तब्बल 44 मशीन व रोख रक्कम ताब्यात घेत काही व्हिडिओ गेम पार्लर चालवणारे व खेळणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत.  कारवाईच्या धास्तीने इतर तालुक्यातील व्हिडिओ गेम पार्लर तूर्तास बंद आहेत परंतु आम्हास मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओ गेम पार्लरचे मालक बनावट कागदपत्रांच्या आधारे सदर व्हिडिओ गेमची मशीन ही कौशल्य (skill game) खेळ प्रकारातील असल्याचे भासवून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवानगी घेऊन बंद असलेले अनधिकृत व्हिडिओ गेम पार्लर पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील तरुण युवक देशोधडीला लागले आहेत तरी अनधिकृत व्हिडिओ गेम पार्लर वर कारवाई करावी व अनधिकृत व्हिडिओ पाहिला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.