'तो' सभेचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करा

अमरेश कदम यांची डिगस सरपंचांकडे मागणी
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 04, 2023 17:54 PM
views 688  views

कुडाळ : डिगस ग्रामपंचायत ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल माध्यमावर प्रसारित करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी डिगस ग्रामस्थ अमरेश कदम यांनी डिगस ग्रामपंचायत सरपंच पुनम पवार यांना निवेदन देत केली आहे.


डिगस ग्रामपंचायत ग्रामसभेच्या या वर्षीच्या पहिल्या सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल माध्यमांवर अपलोड करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा त्या व्यक्तीला तो व्हिडिओ युट्युब वरून काढून टाकण्यास सांगावे तसेच यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे अमरेश कदम यांनी डिगस ग्रामपंचायत सरपंच पुनम पवार यांच्याकडे केली आहे.