ताज प्रकल्प - वेळागर प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनायक राऊत यांचे प्रयत्न : संजय पडते

Edited by: दिपेश परब
Published on: July 29, 2023 19:49 PM
views 97  views

वेंगुर्ला :  शिरोड्यातील वेळागर चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले तर युवानेते आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते त्यांनी ताज हॉटेल होण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. मात्र सध्या या मतदारसंघाचे आमदार हे ५० खोके घेऊन स्वतः चा स्वार्थ साधत आहेत. लोकांचं त्यांना काहीही देण घेण नसून त्यांनी शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे. तेव्हा या पुढील निवडणुकीत या महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सत्तापिपासू भाजप सोबत या आमदारांना घरी बसवण्याच काम जनताच करणार अशी जोरदार टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिरोडा येथे केली.


     माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिरोडा येथील श्री माऊली सभागृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून  कार्यकर्ता संवाद मेळावा व गरजू शेतकऱ्यांना खत वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना संजय पडते बोलत होते. यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब,  जिल्हा समन्वयक बाळा गावडे, वेंगुर्ला तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर यांनी उपस्थित कार्यकर्ते व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सुमारे २५० शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आले. 

  यावेळी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, उपतालुकाप्रमुख सुधाकर राणे, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, महिला विभाग संघटिका रश्मी डिचोलकर, अल्पसंख्याक सेलचे तालुका प्रमुख रफिक शेख, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, युवतीसेनेना उपजिल्हाप्रमुख नंदिनी धानजी, युवतीसेना तालुका प्रमुख वैशाली वडर, उपविभाग प्रमुख सुनील धानजी, रेडी माजी उपसरपंच नामदेव राणे, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग नाईक, प्रथमेश बांदेकर, आप्पा साळगावकर, प्रविण धानजी, अशोक नाईक आदी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.