तबलजी बंड्या धारगळकर यांचा गोवा येथे सत्कार

Edited by: विनायाक गावस
Published on: June 29, 2023 19:16 PM
views 295  views

सिंधुदुर्ग :  जैवविविधता व्यवस्थापन समिती गोवा यांच्या वतीने प्रसिद्ध तबलावादक बंड्या धारगळकर यांना ४० वर्ष संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सचिव डॉ. प्रदिप सरमुकादम,दै. हेराल्डचे संपादक  अवित बगळी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कै भालचंद पार्सेकर यांचे पट्टशिष्य असलेल्या धारगळकर यांना महाराष्ट्र व गोवा राज्याचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

त्यांनी अनेक नामवंत गायक गायिका किर्तनकारांना साथसंगत केली आहे. एक उत्तम साथीदार म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले असून आजही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.स्वामी विवेकानंद पतसंस्था शाखा सावंतवाडी येथे नोकार संभाळून  ते आपली कला जोपासत आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने त्यांच्या मित्रमंडळीनी व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे .