आ. प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते तबला वादक बंड्या धारगळकर यांचा गौरव !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 25, 2024 08:31 AM
views 190  views

सावंतवाडी : गोवा येथे झालेल्या संवाद संगीत संस्थेच्या 9 व्या संगीत संमेलनात गुरुवर्य पंडीत सुधाकर करंदीकर व  पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते प्रसिद्ध तबला वादक बंड्या धारगळकर यांचा गौरव करण्यात आला.

त्यांनी 40 वर्ष संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून कै.भालचंद्र पार्सेकर यांच्याकडे तबला वादनाचे धडे घेतले. त्यांना आजपर्यंत महाराष्ट्र व गोवा राज्यात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी संगीत क्षेत्रात तबला वादन करत आहेत.

आकाशवाणी, दूरदर्शन, सीडी, कैसेटसाठी त्यांनी अनेक गायक-गायिका किर्तनकार यांना साथ केली आहे. ते उत्कृष्ट तबला साथीदार म्हणून ओळखले जातात