
सावंतवाडी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित T20 क्रिकेट स्पर्धेत भाग घेणेसाठी मुलांचा लेदर बॉल क्रिकेट संघ निवड सावंतवाडी जिमखाना मैदानावर मंगळवार 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील रहिवासी असलेल्या मुलांना निवड चाचणीत भाग घेता येईल. खेळाडूंनी पुर्ण गणवेशात, आधार कार्ड, प्रवेश शुल्क रुपये 200/- सोबत घेऊन यावे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या चाचणीत भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा चेअरमन गुरुनाथ चोडणकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी नंदकिशोर रेडकर 9403559884 यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.