निवडणूक प्रक्रिया शांततेत, निष्पक्ष - पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : एम. देवेंदर सिंह

Edited by:
Published on: March 26, 2024 14:37 PM
views 111  views

सिंधुदुर्गनगरी : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत,  निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी  सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन 46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी एम देवेंदर सिंह यांनी केले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून मा. निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार विविध समित्यांची व पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण शिबींराचेही आयोजन करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली. 

46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ पुर्वतयारी आढावा बैठक नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र मठपती, निवासी उपजिल्हाकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)बालाजी शेवाळे, रत्नागिरी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल गायकवाड उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसहिंतेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचना देवून श्री. सिंह पुढे म्हणाले, निवडणूक काळात पक्ष मेळावे, सभा, यांच्यावर यंत्रणांनी लक्ष ठेवावे. गैर प्रकार होवू नये याची दक्षता घ्यावी. गैरप्रकार होत असल्यास त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. निवडणूक समित्यांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात.

46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश असून यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 265- चिपळूण, 266- रत्नागिरी, 267- राजापूर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 268- कणकवली, 269- कुडाळ व 270- सावंतवाडी मतदार संघाचा समावेश आहे. यामध्ये दि. 23 जानेवारी 2024 च्या मतदार यादीनुसार मतदारांची संख्या एकूण मतदार 14 लाख  38 हजार 471 असून यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 8 हजार 487 तर महिला मतदार 7 लाख 29 हजार 973 असून इतर 11 मतदारांचा समावेश आहे. 18 ते 19 वयोगटातील नवीन मतदारांची  एकूण संख्या 13 हजार 763 असून यामध्ये पुरुष मतदार 7 हजार 475 तर महिला मतदार 6 हजार 288 आहे. दिव्यांग मतदारांची संख्या 11 हजार  261 असून यामध्ये पुरुष मतदार 6 हजार 643 तर महिला मतदार 4 हजार  618 आहेत.  85 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील जेष्ठ मतदारांची संख्या 26 हजार 591 असून यामध्ये पुरुष 10 हजार 37 तर महिला 6 हजार 554 आहेत.  विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे रत्नागिरी जिल्हा 265- चिपळूण-336, 266- रत्नागिरी- 345+2, 267- राजापूर- 341, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 268- कणकवली- 332, 269- कुडाळ- 278 व 270- सावंतवाडी- 308 अशी एकूण 1 हजार 940 +2 मतदान केंद्राची संख्या आहे.

निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी मनुष्यबळाचेही नियुक्ती करण्यात आली असून मतदार संघनिहाय अधिकारी संख्या पुढीलप्रमाणे 265- चिपळूण झोनल अधिकाऱ्यांची संख्या- 39 राखीव झोनल अधिकारी संख्या-4 असे एकूण 43.  266-रत्नागिरी झोनल अधिकाऱ्यांची संख्या- 35 राखीव झोनल अधिकारी संख्या-4 असे एकूण 39. 267- राजापूर झोनल अधिकाऱ्यांची संख्या- 49 राखीव झोनल अधिकारी संख्या-4 असे एकूण 53. 268- कणकवली झोनल अधिकाऱ्यांची संख्या- 47 राखीव झोनल अधिकारी संख्या-6 असे एकूण 53. 269- कुडाळ झोनल अधिकाऱ्यांची संख्या- 38 राखीव झोनल अधिकारी संख्या-6 असे एकूण 44. 270- सावंतवाडी झोनल अधिकाऱ्यांची संख्या- 42 राखीव झोनल अधिकारी संख्या-6 एकूण 48. अशी एकूण झोनल अधिकाऱ्यांची संख्या- 250 राखीव झोनल अधिकारी संख्या-30 असे एकूण 280 इतकी आहे.   

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस चेकपोस्टची संख्या 268- कणकवली मध्ये खारेपाटण, फोंडा, आंबेरी, करुळ व भुईबावडा अशी एकूण 5 पोलीस चेकपोस्ट आहे. 269- कुडाळ मध्ये नेरुर, माड्याचीवाडी, बेळणे, सावरवाड अशी एकूण 4 पोलीस चेकपोस्ट आहे. तर 270- सावंतवाडी मध्ये बांदा, आंबोली, सातार्डा, आरोंदा, रेड्डी, मठ, विजघर, आई व दोडामार्ग अशी एकूण 9 पोलीस चेकपोस्ट आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ एकूण 7 हजार 167 असून यामध्ये पुरुष 4 हजार 361 तर महिला 2 हजार 561 कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे.  46- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग किशोर तावडे यांनी दिली. 

यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी आचारसंहिता अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उप विभागीय अधिकारी राजापू श्रीम. माने यांनी टपाली मतदानाबाबत सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. तसेच रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.