
देवगड : जलतरण स्पर्धा ही मानवी जीवनाशी निगडीत उपक्रम शृंखला आहे. जलतरण स्पर्धा ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून ही एक आरोग्यदायी, आत्मविश्वास वाढवणारी आणि पर्यावरणाशी सुसंगत अशी उपक्रम शृंखला असल्याचे देवगड तहसीलदार आर.जे. पवार यांनी जलतरण स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमला संबोधीत करताना सांगीतले.
दुर्गामाता कला क्रीडा मंडळा विजयदुर्ग व जिम स्विम रमनमाला अकॅडेमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमानाने ऐतिहासिक वारसा असलेल्या विजयदुर्ग-वाघोटन खाडीत जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तेलंगणा, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, बेळगाव,सिंधुदुर्ग आदी ठीकाणच्या वय वर्षे०६ पासून ते ६० वर्षापर्यंतच्या सर्व अबाल वृद्धांपर्यंतच्या वयोगटातील जलतरण स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला होता. यास्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, शिल्ड देऊन गौरविण्यात आले. या बक्षीस वितरण प्रसंगी तहसीलदार आर. जे. पवार, मेरिटईम बोर्ड बंदर निरीक्षक उमेश महाडिक, सरपंच रियाझ काझी, महेश बिडये श्री. दुर्गामाता कला क्रीडा मंडळाचे सचिव संजना आळवे,जिम स्विम अकॅडेमी कोल्हापूर अध्यक्ष अजय फाटक व अन्य मान्यवर उपस्थितहोते.
या प्रसंगी बोलतान तहसीलदार पवार म्हणाले जलतरण हे एक जीवन कौशल्य आहेसमुद्र संपन्न कोकणात वाढणाऱ्या मुला मुलींसाठी तर जलतरण हे केवळ खेळ नाही तर जीवनातील सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला चालना देणे ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज ओळखून श्री. दुर्गा माता कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग तसेच जिम स्विम मंडळ कोल्हापूर यांनी सतत आठ वर्षे या प्रेरणादायी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे त्यांनीविशेष कौतुक केले. या प्रसंगी प्रदीप कदम व मेरिटईम बोर्ड बंदर निरीक्षक उमेश महाडीक यांनी देखील शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या सचिव संजना आळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
: विजयदुर्ग -वाघोटन खाडी जलतरण स्पर्धा बक्षीस वितरण करताना तहसीलदार आर. जे. पवार, मेरिटईम बोर्ड बंदर निरीक्षक उमेश महाडिक, सरपंच रियाझ काझी, महेश बिडये श्री. दुर्गामाता कला क्रीडा मंडळाचे सचिव संजना आळवे,जिम स्विम अकॅडेमी कोल्हापूर अध्यक्ष अजय फाटक व अन्य मान्यवर.