सफाई कामगार 2 महिने पगारापासून वंचित

बबन साळगावकरांनी वेधलं शिक्षणमंत्र्यांचं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: August 23, 2023 15:09 PM
views 42  views

सावंतवाडी : सफाई कामगारांचा प्रश्न गंभीर असून सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगार दोन महिने पगारापासून वंचित आहेत. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर  यांनी केली आहे.


 गेली दोन महिने शहरातील सफाई कामगार उपास मारीचे जीवन जगत आहे. शासन स्तरावरती याची दखल घेतली गेली नाही. ही गंभीर बाब आहे. सफाई कामगार नसल्यामुळे शहरात कचरा हस्तव्यस्त झालेला आहे. सफाई कामगारांची आंदोलन झाली सर्वपक्ष नेत्यांनी पाठिंबाही दिला होता. या गंभीर बाबीकडे शिक्षण मंत्र्यांनी त्वरित लक्ष देऊन गरीब कामगारांचा प्रश्न निकाल काढावा यापूर्वीच त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक होतं. परंतु ते कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना वेळ मिळाला नसेल गरीब कामगारांचा पीएफ हडप करणाऱ्यांवरती पोलीस केसेस दाखल दाखल करा सफाई कामगारांची स्थानिक आमदार तसेच शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी कामगारांची बैठक घ्यावी काम झालं तरी दिलासा द्या या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर पोलीस केसेस तसेच पीएफच्या खात्यामार्फत ठेकेदारावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे.