स्वर्गीय प्रकाश परब यांचा विकासाचा वसा पुढे न्यावा : विलास नाईक

Edited by:
Published on: May 04, 2024 08:08 AM
views 31  views

सावंतवाडी : स्वर्गीय प्रकाश परब यांनी तळवडे गावच्या विकासाचा सुरू केलेला वसा पुढे नेण्यासाठी विलास नाईक यांनी सहकार, सामाजिक, विकासात्मक कार्यात भाग घेणे गरजेचे आहे. सामाजिक सेवेची मोठी आवड असल्याने आता शासकीय सेवेतील निवृत्त झाल्यावर गावच्या विकासासाठी सहकार व सामाजिक क्षेत्रात पदार्पण करून गावाला विकासाच्या दिशेने न्यावे व युवा पिढीला सोबत घेऊन मार्गदर्शन करावे अशा सदिच्छा त्यांच्या सेवानिवृत्त निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्कार सोहळयांत मान्यवरांनी व्यक्त केल्या.

तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास नाईक हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल तळवडे येथील प्रकाश परब मित्र मंडळ, अर्बन बँक तळवडे व विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने नुकताच खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रसाद देवधर, लीलाधर घाडी, तळवडे अर्बन बँक चेअरमन विलास परब, तळवडे सोसायटी चेअरमन आप्पा परब, यशवंत गोडकर, विलास नाईक, त्यांच्या पत्नी मिरा नाईक, कन्या कु. नाईक, संजू पई, अनिल जाधव, सिमा मठकर, श्यामसुंदर मालवणकर, दिलीप मालवणकर, सीमा मठकर, विकास नाईक, रवींद्र काजरेकर, महेश परब, सुधीर सावंत, नमिता सावंत, संतोष राऊळ, योगेश सावंत, रवींद्र सावंत, दिनेश सावंत व विलास नाईक मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा देताना संगितले की, गावच्या सहकार, सामाजिक व विकासात्मक कार्यात विलास नाईक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत इन्स्पेक्टर या पदावर काम करत असताना त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा बजावली. गेली 34 वर्ष त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सेवा बाजवताना बँकच्या माध्यमातून ग्रामीण भागतील ग्राहकांना प्रामाणिक सेवा दिली. त्यांच्या प्रामाणिक पणामुळे जिल्हा बँकेमार्फत त्यांना अनेक वेळा गौरविण्यात आले. मोठ्या हालकीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन त्यांनी बँक सेवेच्या माध्यमातून समजाभिमुख कार्य बजावले.  जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केले आहे.  अशा प्रकारचे मनोगत प्रकाश परब मित्रमंडळाच्या व सेवाभावी संस्था, अनेक मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन तळवडे गावातील अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने त्यांचा खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी तळवडे गावच्या विकासाचे सच्चे शिलेदार स्वर्गीय प्रकाश परब यांचा वसा श्री. नाईक यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा या निमित्ताने अनेकांनी व्यक्त केली.