श्री देव कुडाळेश्वर भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी प्रथम !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 25, 2023 17:48 PM
views 99  views

कुडाळ :  श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ कुडाळ आयोजित कै. ऍड अभय देसाई स्मृतीप्रित्यर्थ 48 वी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

 निकाल पुढीलप्रमाणे : 

 प्रथम क्रमांक स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी, द्वितीय क्रमांक  श्री स्वामी समर्थ  प्रासादिक भजन मंडळ कलंबिस्त, तृतीय क्रमांक सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली, चतुर्थ क्रमांक श्री रवळनाथ प्रसादिक  भजन मंडळ पिंगळी, पाचवा क्रमांक उमळकर प्रासादिक भजन मंडळ कुडाळ,


 वैयक्तिक बक्षिसे 

उत्कृष्ट गायक - सर्वेश कृष्णा राऊळ ( ओमकार प्रासादिक भजन मंडळ कोलगाव ) उत्कृष्ट हार्मोनियम वादक - श्री विश्राम घाडी ( गांगेश्वर कृपा प्रासादिक भजन मंडळ श्रावण) उत्कृष्ट पखवाज वादक -मेहल कांडरकर (स्वरधारा प्रसादिक भजन मंडळ तांबोळी) उत्कृष्ट तबलावादक श्री सचिन कुडतडकर ( कुलस्वामी भजन मंडळ पावशी) उत्तेजनार्थ झांज वादक श्री प्रथमेश घाडीगावकर ( सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ कुसबे)

 या 48 व्या भजन स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या 25 भजन मंडळांना या स्पर्धेसाठी प्रवेश देण्यात आला त्यापैकी 23 भजन मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. तर दोन भजन मंडळे अनुपस्थित राहिले. भजन स्पर्धेचे परीक्षण शहाजहान शेख व  लक्ष्मण उर्फ संजय दळवी यांनी केले. या भजन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.