
कणकवली : हिंदू नववर्षानिमित्त खारेपाटण रामेश्वरनगर येथे संतोष रानडे व सौ. दीपा रानडे कुटुंबियांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे 'स्वरसाधना' हा संगीत व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमातगोवा येथील प्रसिद्ध गायिका मुग्धा गावकर व त्यांच्या सहकारी कलाकार यांच्या सुरेल आवाजांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मुग्धा गावकर यांनी अभंग,भक्तीगीते व नाट्यगीते आदी विविध गाणी गायली. कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर (संगमेश्वर )यांनी केले. हार्मोनियम वादक प्रसाद शेवडे (देवगड ) व तबला वादक अभिजीत जोशी (देवगड) यांची संगीत साथ लाभली.यावेळी खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर व त्यांचा शिष्य तथा खारेपाटण हायस्कुलचा विद्यार्थी पीयूष मांगले यांनी संगीत क्षेत्रात देशपातळीवर यश संपादन केल्याबद्दल त्यांचा गायिका मुग्धा गावकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. खारेपाटण येथे रानडे कुटुंबियांच्या वतीने सलग १७ वर्षे मराठी नव वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम घेण्यात येतो.











