कुडाळ शहर शिवसेना आयोजित रस्सीखेच स्पर्धेत आडेलीचा हिरकणी ग्रुप प्रथम क्रमांक

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे केले होते आयोजन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 20, 2026 19:59 PM
views 40  views

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आडेली येथील हिरकणी ग्रुपने पटकावला तर द्वितीय क्रमांक कुडाळच्या एस एम सिंधू स्पोर्ट्स तर तृतीय क्रमांक नेरुरच्या शिवशक्ती ग्रुपने मिळवला.

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे महिलांच्या रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये १८ संघाने सहभाग दर्शवला होता या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते झाला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शहर प्रमुख अभिषेक गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, जिल्हा बँक संचालक नीता राणे, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, साक्षी सावंत, रेखा काणेकर, राकेश कांदे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, माजी सभापती सुनील भोगटे, रचना नेरूरकर, चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, शेखर राणे, बाळा कुडाळकर, राजवीर पाटील, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी, योगेश काळप, सुशील कदम, नागेश परब आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की अशा प्रकारच्या स्पर्धा भरून महिलांचे मनोबल वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो कौतुकास्पद आहे पुढील वर्षी आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करताना सर्व ठिकाणी आरोग्य शिबिर राबवले जाईल तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच यावेळी शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी पुढील वर्षी ही स्पर्धा २१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी असेल असे घोषित केले. या स्पर्धेचे परीक्षण वैभव कोंडसकर व सिद्धार्थ बावकर यांनी केले तर स्पर्धेचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले