
सिंधुदुर्ग : AIU आयोजित नॅशनल युथ फेस्टिवल 2026 चेन्नई येथे पार पडले. या यूथ फेस्टिवल मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी या महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार समर्थ संतोष गवंडी याने मुंबई विद्यापीठाच्या नॅशनल टीम मध्ये आपली जागा मिळवली. तब्बल 500 विद्यालयातून पन्नास जणांची निवड या संघात झाली होती आणि त्या संघात समर्थचा देखील सहभाग होता. सर्वप्रथम राज्यस्तरीय युवा महोत्सव इंद्रधनुष्य 2026 यामध्ये सहभाग घेऊन चार सुवर्णपदक समर्थने मिळवले. 
त्यानंतर झोनल राउंडमध्ये तब्बल चार सुवर्णपदक मिळवून त्यांनी नॅशनल मध्ये जागा पक्की केली. अभिमानाची गोष्ट की ह्याच वर्षी नॅशनल युथ फेस्टिवल मध्ये एक नवीन कलाप्रकार क्रिएटिव्ह डान्स कोरिओग्राफी आयोजित करण्यात आला होता. व या कलाप्रकारचं नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मुंबई विद्यापीठाने समर्थ गवंडी ला दिली. व त्याने त्या संधीचा फायदा करत क्रिएटिव्ह डान्स या कलाप्रकारांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या संघाची नॅशनल ला निवड करून दिली. त्याचप्रमाणे मुकाभिनय ,स्कीट, एकांकिका या कला प्रकारांमध्ये देखील तो स्वतः सहभागी होता. व या सर्व कलप्रकारांमध्ये नॅशनला सुवर्ण पदक त्याने मिळवल.

समर्थ हा गेल्या वर्षी देखील मुंबई विद्यापीठाच्या संघात विद्यार्थी म्हणून काम करत होता. परंतु समर्थ ला सुवर्ण पदकाची थोडीशी वाट बघावी लागली. पण अखेर २०२६ या महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाच्या संघातून त्यांनी सुवर्णपदक मिळवल व मुंबई विद्यापीठाचे नृत्यर्थीदर्शन देखील केले. या सर्व त्याच्या कामगिरीस श्री पंचम भीमराज महाविद्यालय सावंतवाडी या त्याचा महाविद्यालयाचा मोठा सहभाग व समर्थ ला सहकार्य होते.











