स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे औदुंबर स्वामी मंदिरात श्रमदान

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2026 22:48 PM
views 10  views

सावंतवाडी : पोलिस ठाण्याच्या औदुंबर स्वामी मंदिर परिसराच्या नूतनीकरण कामात स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. या उपक्रमाचे  पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी कौतुक केले.सावंतवाडीतील औदुंबर स्वामी मंदिराचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलीस आणि सैन्य दलात भरती होण्यासाठी सज्ज होत असलेल्या या तरुणांनी या कामात मदतीचा हात दिला.


यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, अमित राऊळ, उत्सव समितीचे सदस्य अमोल टेंबकर, भुवन नाईक, प्रणव तारी आदी उपस्थित होते. यावेळी विटा-सिमेंट वाहून नेण्यापासून ते परिसराच्या स्वच्छतेपर्यंत सर्वच कामांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण म्हणाले, कठीण परिश्रमाची तयारी आणि सामाजिक बांधिलकी हेच एका खऱ्या सैनिकाचे आणि पोलिसाचे लक्षण आहे. मुलांच्या या सेवाभावी वृत्तीचे त्यांनी मनापासून कौतुक केले.


अकॅडमीचे संचालक हर्ष जाधव म्हणाले, आपल्या अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना शिस्त आणि श्रमाचे प्रत्यक्ष धडे देण्यासाठीच या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पियुष जाधव, विनिंत परब, श्रीधर कोठावळे, हर्ष गोसावी, अभिनव जाधव, अर्थव बागल, जितेश कुंभार, आर्यन केळजी, सायली गावडे, सौम्या मेस्त्री, आदिती परब, लावणी कुंभार, रोहिणी धुरी, तनिष्का राणे, साक्षी घाडीगावकर, सानिका धुरी, नियती पारकर, खूशी खरात, तन्वी गवस, गौरी कासारीकर, रेणुका गवळी, नामदेव कुंभार, निखिल गोसावी, विकास जाधव, मधुकर दळवी, सर्वेश गावडे यांसह मंदिर समितीचे पदाधिकारी आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकॅडमीने घेतलेल्या या पुढाकारामुळे आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तीमुळे संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.