गोव्यात ४ मे रोजी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे 3 रे ''राष्ट्रीय महाअधिवेशन''

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा 'राष्ट्रीय गौरव पुरस्कारा'ने होणार सन्मान | संपादक संचालक संजय ढवळीकर यांचा खास परिसंवाद
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 02, 2026 21:47 PM
views 12  views

पणजी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन २०२६ येत्या ४ मे रोजी गोव्याची राजधानी पणजी येथील कला अकादमी येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना 'राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात येणार आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या महाअधिवेशनाचे उद्घाटन संपन्न होणार असून पत्रकारिता आणि तंत्रज्ञान या विषयांवर महत्त्वपूर्ण परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले आहे. ''पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हान'' यावर कोकणसादचे संपादक-संचालक संजय ना. ढवळीकर यांच्या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्गजांची उपस्थितीत या अधिवेशन लाभणार आहे. 

अधिवेशनाचे उद्घाटन ४ मे २०२६ रोजी  सकाळी १० वाजता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, गोव्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार गोरे, मंत्री उदय सामंत, गोवा खासदार सदानंद तानावडे, गोवा मंत्री रमेश तवडकर, महाराष्ट्राचे आमदार निलेश राणे, डॉ. ओमप्रकाश शेटे, आम. शिवाजी पाटील, रामकृष्ण वेताळ, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी लाभणार आहे. तसेच महाराष्ट्र व गोवा राज्यातील अनेक खासदार आणि आमदार उपस्थित राहणार असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन पार पडत आहे.

यावेळी विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत: यात कमलाकांत तारी (गोवंश संवर्धन), डॉ. महुवा साहा (शास्त्रज्ञ), आमदार निलेश राणे (उत्कृष्ट कार्यपटू), कमलेश बांदेकर (योग प्रसारक), दीपक नार्वेकर (उत्कृष्ट प्रशासन), गुरुप्रसाद पावसकर (आयुक्त, दिव्यांग संचालनालय), नेहा आंग्रे गांवस (सामाजिक कार्य), प्रकाश कुलकर्णी (कृषी), माणिक शेडगे, (सामाजिक कार्य), निलेश सांबरे (ग्रामसेवा),  प्रा. विशाल गरड, (लोक व्याख्यानकर)

सौ. राधा खताळ (सर्वोकृष्ट सरपंच), गोवर्धन दराडे (अनाथ संगोपन),  संतोष ठोंबरे (उद्योग व समाजसेवा), 

पोश गुप्ता (गो सेवा), राजेंद्र अग्रवाल (सामाजिक कार्य), राजेंद्र पाठक (बाल मदत),  विकास देशमुख (आरोग्य सेवा), चित्राताई क्षीरसागर, (कवयित्री व साहित्यिक), ग्रामविकास संस्था नागझरी, सातारा 

(जलसंधारण व ग्रामविकास संस्थात्मक पुरस्कार) प्रदान करण्यात येणार आहे‌

दरम्यान, दुपारच्या सत्रात पत्रकारिता आणि सामाजिक विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हानं यावर कोकणसादचे संपादक-संचालक संजय ना. ढवळीकर मार्गदर्शन करणार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप यावर ॲड. संदीप कायदे, समाजमाध्यमांचा न्यायालयीन प्रक्रियेतील अडथळा यावर ॲड. नकुल पार्सेकर, AI चा डिजिटल मीडियातील प्रभावी वापर यावर  सौमित्र देसाई यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २:३० वाजता राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार राजा माने घेणार आहेत. दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनाची सांगता सायंकाळी ४:०० वाजता होईल. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित राहणार असून या अधिवेशनाच्या माध्यमातून डिजिटल मीडिया क्षेत्रातील आव्हानांवर मंथन होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य संघटक सिताराम गावडे, कोकण विभाग अध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर व कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केल आहे.