कुडाळची गायत्री बागलकर जिल्ह्यात पहिली

▪️सावंतवाडीचा दत्तराज पै द्वितीय तर मालवणची वैदेही पालकर तृतीय
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 02, 2026 21:00 PM
views 41  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर झाला. यात कुडाळ हायस्कूलची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी गायत्री विवेकानंद बागलकर हीने ९५.६७ टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर सावंतवाडीच्या राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या दत्तराज शैलेश पै याने ९५ टक्के गुणांसह जिल्ह्यात द्वितीय तर ९४.८६ टक्के गुणांसह मालवण तालुक्यातील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी वैदेही पालकर तृतीय क्रमांकांची मानकरी ठरली‌.  

तसेच डॉन बॉस्को, ओरोस वाणिज्य शाखेची शुभ्रा युगलकिशोर प्रभुगावकर ९४.८३ टक्के व कुडाळ हायस्कूल वाणिज्य शाखेची पुनम दिनेश दळवी ९४.१७ टक्के गुणांसह जिल्ह्यात उत्तेजनार्थ ठरली. गुणवंत विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून राज्याचा निकाल 89.79 टक्के निकाल लागला. तर कोकण विभाग  94.14 टक्क्यांसह अव्वल राहीला. जिल्ह्यात नियमित विद्यार्थ्यांपैकी ८०२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७९७३ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ७६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकुण निकाल 95.94 टक्के एवढा लागला आहे. पुनर्परीक्षार्थी गटात ६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५९ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाचा निकाल ५४.२३% इतका नोंदवण्यात आला आहे.


सावंतवाडी तालुक्याचा निकाल 93.12 टक्के लागला असून RPD चा दत्तराज पै प्रथम, RPD ची हर्षदा कासार द्वितीय तर RPD ची  निधी साटेलकर, चिन्मय असणकर आणि मानस कोलते हे तृतीय क्रमांकानी उत्तीर्ण झालेत.

दरम्यान,  दोडामार्ग तालुक्याचा निकाल 93. 03 टक्‍के लागला असून, दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा संचित परब प्रथम, न्यू इंग्लिश स्कूल भेडशीची सोनिया गवस दुसरी तर कुडासे हायस्कूलचा विघ्नेश धुरी तिसरा आला. 

वेंगुर्ला तालुक्याचा निकाल 97.19 टक्‍के लागला असून  शिरोडा गोगटे कनिष्ठ महाविद्यालयाची गायत्री वारगांवकर पहिली, बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचा पुष्कर पेडणेकर द्वितीय तर खर्डेकरची स्नेहा नार्वेकर तिसरी आलीय. 

कणकवली तालुक्याचा निकाल 95.95 टक्‍के लागला असून कणकवली महाविद्यालयाची प्रतिक्षा पाटील पहिली, कणकवली महाविद्यालयाची सुकन्‍या राणे दुसरी, आयडियल इंग्‍लिश स्‍कुलची दिया प्रभूदेसाई तिसरी आली.

देवगड तालुक्याचा निकाल 96.82 टक्के लागला असून न. शा. पंतवालावलकरची  सिध्दी कदम पहिली, न. शा. पंतवालावलकरची मुक्ता सारंग दुसरी, न. शा. पंतवालावलकरचा शुभम टाकळे  तिसरा आलाय.

वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल ९७.९७टक्के लागला असून पहिले तीन क्रमांक  कै. हेमंत केशव रावराणे क. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटाकावले यामध्ये आकांक्षा अजित खाडये  पहिली, निहारिका पाटील दुसरी,  तर संपदा प्रतिम जाधव  तिसरी आलीय.

मालवण तालुक्याचा निकाल ९५.७३ टक्के लागला असून, कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी वैदेही पालकर प्रथम,  स्व. सौ. जयश्री वामन प्रभू कला व वाणिज्य महाविद्यालयाचा सखाराम गोसावी द्वितीय तर टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा निखिल भुर्के हा तिसरा आलाय..

कुडाळ तालुक्याचा निकाल 97.72 टक्के लागला असून कुडाळ हायस्कूलच्या गायत्री बागलकर हिने तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला असून, द्वितीय क्रमांक ओरोस डॉन बॉस्को विद्यालयाच्या शुभ्रा प्रभूगावकर तर कुडाळ हायस्कूलच्या पुनम दळवी हिने तृतीय क्रमांक मिळवला.