
सावंतवाडी : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या २४ व्या वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप मध्ये सावंतवाडीची कु. स्वरा अभय वाटवे हिला काता प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. तर कु. अर्णव नंदकुमार गावडे याला काटा व कुमितो प्रकारामध्ये दोन ब्राँझ मेडल प्राप्त झाली आहेत. सदर स्पर्धेमध्ये ओकिनावा गोजुकान कराटे सावंतवाडीच्या १४ वर्षा खालील गटांमध्ये भाग घेतलेल्या सातही विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व ब्राँझ मेडल मिळाली आहेत. कुमारी स्वरा वाटवे ही सुधाताई कामत जि. प. शाळा इयत्ता पाचवी मध्ये आहे तर अर्णव गावडे हा कळसुलकर इंग्लिश स्कूल इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. त्यांना कराटे प्रशिक्षक दिलीप राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.