बांदा केंद्रशाळेची स्वरा बांदेकर नॅशनल‌ अबॅकस स्पर्धेत पाचवी

Edited by: संदीप देसाई
Published on: February 04, 2024 14:50 PM
views 99  views

बांदा : प्रोऍक्टिव्ह अबॅकस यांच्या  वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत स्पर्धेत जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्र शाळेत इयत्ता चौथीत शिकणारी व बांदा येथील एकलव्य अबॅकस क्लासची विद्यार्थीनी कुमारी स्वरा दीपक बांदेकर हिने राष्ट्रीय पातळीवर पाचवा क्रमांक प्राप्त केला ही स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथे संपन्न झाली असून या स्पर्धेत महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक,तेलंगणा व गुजरात या पाच राज्यांतील २५०००विद्यार्थी सहभागी झाले होते. 

स्वरा हिला बांदा येथील एकलव्य अबॅकस च्या शिक्षिका स्नेहा केसरकर हिचे मार्गदर्शक मिळत आहे. स्वराने यापूर्वी स्वराने अनेक अबॅकस स्पर्धेत सुयश संपादन केले आहे.स्वराने  मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्षा संपदा सिध्दये मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांनी अभिनंदन केले आहे.या विद्यार्थ्यांनीला बांदा केंद्र शाळेतील शिक्षक वर्ग वडील दिपक बांदेकर व आई  साक्षी बांदेकर यांचे  मार्गदर्शन लाभले. स्वराने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.