साळशी हायस्कूलात उद्या ‘स्वर सुरभी’ !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 09, 2024 13:52 PM
views 12  views

देवगड : देवगड मधील साळशी ग्रामविकास मंडळ, साळशी संचलित माध्यमिक विद्यामंदिर साळशी यांचे सांस्कृतिक वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ उद्या शुक्रवारी १० मे रोजी रात्रौ ७.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याला स्टँडरड चार्टड बँक मुंबईचे प्रतिनिधी किशोर लाड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साळशी सरपंच सौ. वैशाली सुतार, चाफेड सरपंच किरण मेस्त्री, भरणी गावचे सरपंच अनिल बागवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रशालेच्या इमारत नूतनीकरण निमित्त विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर व स्वरहृतू निर्मित ‘स्वर – सुरभी’ हा गीत संगीताचा बहारदार नजराणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गायक सौ. करुणा पटवर्धन, सौ. मनाली बापट, कु. निशा धुरी, कु. संस्कृती जोशी, अभिजित नांदगांवकर,संदीप फडके , तबला वादक सौरभ वेलणकर, ऑक्टो पॅड अश्विन जाधव, पख़वाज मंगेश चव्हाण, हार्मोनियम चैतन्य पटवर्धन तसेच निवेदक सौ. दीप्ती कानविंदे, संगीत संयोजक हर्षद जोशी आदी कलाकार भाग घेणार आहेत.

या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, मुख्याध्यापक माणिक वंजारे, विद्यार्थी मुख्यमंत्री सुमन लब्दे, विद्यार्थी सांस्कृतिक प्रतिनिधी सिध्दमयी साळसकर, तसेच सर्व – संस्था पदाधिकारी , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.