स्वप्नील सावंत याने घेतलं एआयआयओ वर्करचं प्रशिक्षण !

कलंबिस्त दुग्ध व्यवसायिक संस्थेच्यावतीने सन्मान
Edited by: विनायक गावस
Published on: November 15, 2023 16:47 PM
views 89  views

सावंतवाडी : कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी मर्यादित संस्था कलंबिस्त तर्फे कलंबिस्त पंचक्रोशीतील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दुग्ध व्यवसायाकडे वळवण्याच्या दृष्टीने गाई-म्हशी संगोपन पालन उपक्रम हाती घेणार आहे. त्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कृत्रिम रेतन धारक प्राथमिक उपचार ए आय आय ओ वर्कर म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे. स्वप्नील सावंत या तरुणाने गोकुळ व जिल्हा बँक व जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून ए आय ओ वर्कर म्हणून कार्यरत झाला आहे. त्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत, दुग्ध शेतकरी आनंद बिडये, सचिव रमेश सावंत आदींच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी दिवाळी भेट व बोनस वाटप संस्थेच्यावतीने जाहीर करण्यात आला.

दरवर्षी दिवाळी पाडवा दिवशी संस्थेच्या दुग्ध शेतकऱ्यांना दिवाळी भेट व बोनस वाटप करण्यात येतो. यंदाच्या वर्षी संस्थेतर्फे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जनावरांची निगा व प्राथमिक उपचार व्हावेत यासाठी गावातीलच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कृत्रिम रेतन धारकचे प्रशिक्षण दिले. गावातच पशुवैद्यकीय प्राथमिक उपचार वर्कर निर्माण करावेत या दृष्टीने गावातील बीकॉम पदवीधारक दुग्ध शेतकरी तरुण स्वप्निल सावंत याला हे शिक्षण दिले‌. कृत्रिम रेतनधारक ए आय ओ वर्करचे प्रशिक्षण त्यांनी कोल्हापूर येथे पूर्ण केले आहे. 35 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करून तो गावात आता पशुवैद्यकीय जनावरांची प्राथमिक उपचार करण्यास सज्ज झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक व कोल्हापूर गोकुळ दूध संघ जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि भगीरथ प्रतिष्ठान झाराप तसेच कलंबिस्त दुग्ध संस्था यांच्या वतीने ए आय ओ वर्कर चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल ए आय ओ वर्कर स्वप्निल बाबाजी सावंत चा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.  यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री सावंत याने स्पष्ट केले मी 35 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता गावातील पंचक्रोशीत निश्चितपणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कार्यरत राहणार आहे. कलंबिस्त दुग्ध संस्था तसेच गोकुळ व जिल्हा बँक जिल्हा परिषद यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी हे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो म्हैशी गाईची देखभाल व संगोपन कसे राखले जावे या दृष्टीने आपण निश्चितपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेच्यावतीने दुग्ध शेतकऱ्यांना दिवाळी फराळ भेट व बोनस वाटप करण्यात आले. दुग्ध शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे. यावेळी चेअरमन ॲड सावंत यांनी स्पष्ट केले की, दुग्ध संस्थेच्या माध्यमातून गावात सुशिक्षित तरुणांना त्यांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन व संगोपन योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. त्यासाठी तरुणांचे दुग्ध गट तयार केले जाणार आहेत. गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी गावात पशुवैद्यकीय डॉक्टर वेळीच उपलब्ध नसतात अशावेळी आपल्या संस्थेच्या माध्यमातून गावातच प्राथमिक उपचार करण्याच्या दृष्टीने एआयओ वर्कर आता तयार झाला आहे. संस्थेला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहे.

सहा वर्षात सुशिक्षित तरुणांना अशा प्रकारे पशुसंवर्धन आणि जनजागृती करून त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने संस्थेने हे पाऊल टाकले आहे. त्यात यश आले आहे. सुशिक्षित तरुणाने आता नोकरी च्या मागे न लागता स्वतःचा पशुवैद्यकीय उद्योग उभारून कृषी व प्रशु उद्योजक व व्यावसायिक बनावे त्यासाठी निश्चित संस्था तुम्हाला प्रोत्साहन देईल. जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर व संचालक महेश सारंग रवींद्र मडगावकर आधी सर्व संचालक तसेच गोकुळ ची टीम यांनी एआयओ वर्कर साठी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे संस्थेच्यावतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत असे स्पष्ट केले.

यावेळी संस्थेचे सचिव रमेश सावंत संचालक लक्ष्मण राऊळ प्रकाश तावडे गजानन राऊळ आनंद बिडये लवु राऊळ शिवाजी राऊळ सिद्धेश सावंत स्वप्निल सावंत हरिश्चंद्र सावंत श्री प्रकाश पवार दूध संकलक श्री राजन घाडी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे आभार सचिव रमेश सावंत यांनी मानले.