स्वप्नील धुरी यांची ठाकरे शिवसेनेच्या 'सडेतोड वक्ता' पदी नियुक्ती

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 25, 2024 11:55 AM
views 534  views

वैभववाडी : ठाकरे युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांची  रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा  मतदार संघाच्या वक्ते पदी निवड करण्यात आली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून  शिवसेना नेते तथा सचिव  अनिल देसाई यांनी त्यांची  नियुक्ती जाहीर केली आहे. पुढील काही दिवस श्री.धुरी दोन्ही जिल्ह्यांतील विविध सभांमधून पक्षाची भूमिका मांडणार आहेत. धुरी हे दहा वर्षांपासून शिवसेनेचे काम करत आहेत. या आधी त्यांनी युवासेनेचे तालुका प्रमुख ते आता युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस म्हणून काम करीत आहेत.उत्तम संघटन कौशल्य तथा अभ्यासपूर्ण आक्रमक भाषणशैली यामुळे ते सतत चर्चेत असतात.

युवासेनेच्या माध्यमातून विविध सभांमध्ये ते पक्षाची आक्रमकपणे भूमिका मांडत असतात.उत्तम वकृत्व व अभ्यास पुर्ण विषयांची मांडणी करून त्यांनी अनेक सभा गाजवल्या.त्यांच्या भाषणशैलीची दखल  पक्षाकडून घेण्यात आली आहे.त्यांना पक्षांकडून लोकसभा निवडणुकीकरिता वक्ते  पदाची नवीन जबाबदारी देण्यात आली.श्री.धुरी हे पुढील काही दिवस महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विविध सभांमध्ये पक्षाची भूमिका मांडणार आहेत. महीला नेत्या जान्हवी सावंत यांच्यानंतर जिल्ह्यातील युवा नेत्याला वक्ते पदाची जबाबदारी मिळाली आहे. या निवडीनंतर बोलताना धुरी म्हणाले, पक्षांकडून मिळालेल्या या नवीन  जबाबदारीचे संधी समजून काम करणार आणि  या संधीच सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खा. विनायक राऊत, शिवसेना सचिव अनिल देसाई, युवासेना सचिव वरुण सरदेसाई ,उपनेते अरुणभाई दुधवडकर, उपनेत्या जान्हवी सावंत यांचे यावेळी धुरी यांनी आभार मानले.