
देवगड : देवगड हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी- मुंबई संचलित २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ ते १० : गणेश पूजन, पादुका पूजन, पुण्यवाचन होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नामस्मरण व तीन दिवसीय नामस्मरण कार्यक्रमाची सांगता, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ५:०० १०वी – १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान, सायंकाळी ५:०० ते ८:०० भक्तीमय कार्यक्रम होणार आहे. १९ ते २१ जुलै रोजी मठात होणाऱ्या नामस्मरण कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. तसेच १९ ते २१ जुलै कालावधीत देवगड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे.
सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे,अक्कलकोट भूषण, स्वामीरत्न पुरस्काराने सन्मानित ट्रस्टचे संस्थापक सचिव श्री. नंदकुमार पेडणेकर, खजिनदारश्री. ज्ञानेश्वर राऊत, सर्व विश्वस्थ, कार्यकारी मंडळ व गाव समिती यांच्या कडून केले आहे.