स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 29, 2023 13:18 PM
views 145  views

देवगड : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बीचनजीक नव्याने स्थापन करण्यात आलेल्या देवदूत अभिषेक गावकर श्री स्वामी समर्थ मठ येथे कलशारोहण आणि स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांच्या गजरात श्री स्वामी समर्थ जयकारात हा सोहळा झाला. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे, ढोल ताशांच्या गजर, फटाक्यांच्या आतबाजीचं आयोजन करण्यात आले होते.  होम हवन व धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. बाल ब्रम्हचारी श्री मांडवकर यांनी रोजी कलश पूजन केले. कलशारोहण सोहळा वारकरी संप्रदायाचे विलास य. जाधव ,(वरेरी)विजय भ.घाडी (दाभोळे) गणेश गावकर (मिठमुंबरी)यांच्या हस्ते पार पडला. श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व पूजन श्री संत बाळूमामा मंदिर कोंडामाचे अध्यक्ष बबन बोडेकर उभयता यांच्या हस्ते श्री स्वामी भक्त आत्माराम गावकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या सर्व सोहळ्याचे पौरोहित्य महेश (संजू)बोंडाळे अन्य ब्रम्हवृद्सोबत पार पडले. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.