वेंगुर्ल्यात उमेश येरम यांच्या नेतृत्वाखाली श्रमदानाने स्वछता मोहीम...!

Edited by: दिपेश परब
Published on: October 03, 2023 13:10 PM
views 143  views

वेंगुर्ले : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी १ ऑक्टोबर रोजी शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांच्या नेतृत्वाखाली व वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सहाय्याने येथील आनंदवाडी येथे दांडेकर मंदिर व सार्वजनिक विहिरीच्या ठिकाणी श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

यावेळी युवासेना शहरप्रमुख संतोष परब, संजय परब, राजू परब, प्रभाकर पडते, नगरपरिषद कर्मचारी निशा आळवे, अतुल अडसूळ, सुधाकर राऊळ, पूर्वा मसूरकर, मुकादम संतोष जाधव, ग्रामस्थ आर.के. जाधव, लाडू जाधव, सुहास जाधव, मैथिली जाधव, गजानन जाधव, महेंद्र जाधव, रोहित जाधव, सोनम जाधव, सिमरन जाधव, खुशी मठकर, विदीशा मठकर, अनिकेत कदम, विकास जाधव व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.