पेट घेतलेल्या गाडीतून संशयाचे धूर...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 25, 2023 12:32 PM
views 269  views

सावंतवाडी : मळगाव-तळवडे मार्गावर मळगाव ब्रिच जवळपास उभी करून ठेवलेल्या मारुती कारने अचानक पेट घेतला. पावसाची रिमझिम सुरू असताना गाडीने पेट घेतला. त्या गाडीच्या मालकाची चौकशी केली जात आहे. यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान सावंतवाडी नगरपालिकेचा बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. हि कार कोणाची हे उशिरापर्यंत उघड झाले नाही.