कुसुर पोलीस पाटील यांच निलंबन

Edited by:
Published on: January 16, 2023 15:12 PM
views 221  views

वैभववाडी: कुसुर गावचे  पोलीस पाटील रवींद्र सुर्याजी साळुंखे हे एक वर्षांकरिता निलंबित झाले आहेत.प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांनी हा आदेश दिला  आहे.कामकाजात टाळाटाळ केल्याची त्यांच्याविरोधात तक्रारी होती.

   कुसुर सुतारवाडी येथील संदीप शंकर सुर्वे  यांनी कुसुर गावचे पोलीस पाटील श्री.साळुंखे यांच्याविरोधात ३० सप्टेंबर २०२१ प्रांतधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.गावातील काही लोकांशी हातमिळविणी करून गावात जातीयवादी राजकारण करणे,गावात शंकास्पद वातावरण तयार करणे,गावातील लोकशाही,स्वातंत्र्य,समता या मुल्यांची पायमल्ली श्री.पोलीस पाटील करीत असल्याची तक्रार श्री.सुर्वे यांनी केली होती.यासंदर्भात श्री.साळुंखे यांची चौकशी सुरू होती.दरम्यान वैभववाडी तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक वैभववाडी अहवालानुसार प्रांतधिकारी वैशाली राजमाने यांनी पोलीस पाटील श्री.साळुंखे यांना एक वर्षाकरीता निलबिंत केले आहे.