अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संशयित तरुणाला अटक

दोन दिवसांची पोलीस कोठडी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 15, 2023 20:20 PM
views 493  views

वैभववाडी : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयित तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे.त्याला आज ता.१५ न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी घरातून गायब झाली होती. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलीसात तक्रार दिली होती. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.